प्रतिनिधी (दि.२४ जानेवारी):-राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या शेजारी असलेले हजार बाराशे लोकसंख्या असलेले वावरथ जांभळी गाव येथे आज दि.२४ जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वावरथ येथे राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला.यावेळी गौसे आजम सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य राहुरी तालुका शाखा यांच्या वतीने शाळेतील मुलांना खाऊ व पेन देण्यात आले.त्यावेळी तालुका अध्यक्ष उमेश पवार तसेच वावरथचे सरपंच ज्ञानेश्वर धोंडीबा बाचकर,डिग्रस ग्रामपंचायत सदस्य सखाराम जाधव, गावातील प्रतिष्ठित नागरिक,शाळेचे मुख्याध्यापक ठुबे सर, शिक्षक खरमाळे सर अंगणवाडी सेविका अलका बाचकर,मदतनीस सीमा कोळेकर,दिपक भिगांरदे,नितीन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी खरमाळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले राष्ट्रीय बालिका दिवसाच्या राहुरी तालुका अध्यक्ष उमेश पवार यांनी शुभेच्छा देउन उज्वल भविष्याची लहान मुलांसाठी प्रार्थना केली.

