महाराष्ट्र ऐरोस्केटोबॉल संघात नगरच्या खेळाडूंची निवड
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ जानेवारी):८ वी राष्ट्रीय ऐरोस्केटोबॉल स्पर्धा २०२३ ठाणे येथे दि.२७ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान होणार असून भारतातील १८ राज्य व ९०० खेळाडू या मध्ये सहभागी होणार असून नगर जिल्ह्यातील ९ खेळाडूंची महाराष्ट्र संघात वर्णी लागली आहे.त्यांची नावे पुढील प्रमाणे मोहम्मद हकीमजीवाला,आदर्श बिस्वास,अर्णव आंदे,अभिराज सानप,वेदांत साबळे,आदित्य रासकोंडा,कार्तिक मिश्रा,मोहित बकाले,आदर्श मुथा,हे सर्व खेळाडू तक्षीला स्कूल व हार्मोनी इंटरनेशनल स्कूलचे असून त्यांना प्रशिक्षक म्हणून श्री.अमोल ठोंबे व प्रदीप पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे तक्षीला स्कूलच्या प्राचार्या सौ.जयश्री मेहेत्रे व हार्मोनी इंटरनेशनल स्कूलचे प्राचार्य श्री.अशोक बेरड सर यांनी अभिनंदन केले व संघटना अध्यक्ष श्री.सचिन गायकवाड यांनी शभेछा दिल्या.