Maharashtra247

कोतवाली पोलीस गुन्हे तपासात नापास;मात्र ‘त्या’ कामात सर्वात पुढे

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२४ जानेवारी):-शहरातील महत्वाचे असलेले कोतवाली पोलीस ठाणे नेहमीच चर्चेत असते.एकमेकांच्या कुरघोडीत येथील कर्मचारी सर्वात पुढे असतात.ते फक्त कुरघोडी करण्यातच लक्ष घालत असल्याने हद्दीत घडणारे गुन्हे उघड करण्यात ते मागे पडल्याचे दिसते.प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘डिबी’ पथक स्थापन केले जाते.पोलीस ठाण्याचे ते ‘नाक’ असते.या पथकात सहभागी होण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यात स्पर्धा चालते.कोतवाली पोलिसांचे डिबी पथक नेहमीच वादगस्त ठरले आहे.एकमेकांची जिरवाजिरवी या डिबी मध्ये सुरू असते.हद्दीत घडत असलेले गुन्हे उघडकीस आणणे हे डिबी पथकाचे काम असते.परंतू ‘मलिदा’ गोळा करण्यासाठी हे पथक काम करत असल्याचे दिसून येत आहे.कारण हद्दीमध्ये दररोज गुन्हे घडत असताना ते उघड करण्यात या डिबी पथकाला यश आले नाही.वर्षभरात जबरी चोरीचे १६ गुन्हे दाखल झाले त्यातील सात गुन्हे उघड झाले आहे.महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडणार्‍या चोरट्यांचा बंदोबस्त त्यांना करता आला नाही.वर्षभर ८ दाखल गुन्ह्यात फक्त एकाच गुन्ह्याचा तपास या डिबी पथकाने केला आहे.पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या सारख्या ‘खमक्या’ अधिकारी या पोलीस ठाण्याला मिळाला आहे.मात्र त्यांनाही या कर्मचार्‍यांनी अडचणीत आणण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे.दरम्यान एक कर्मचारी साहेबांच्या चांगलाच जवळ गेला आहे.तोच सर्व पाहत असल्याने त्याच्या नावाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

You cannot copy content of this page