शिर्डी प्रतिनिधी:-जगभर प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या सुरक्षा पथकात आता ‘सिंबा’ नावाच्या नव्या श्वानाची एन्ट्री झाली आहे.तीन महिन्याचा ‘सिंबा’ आता बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात दाखल झाला आहे.सिंबाची बीडीडीएस पथकाकडून ट्रेनिंग सुरू असून लवकरच तो साई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आहे.
येथे दररोज लाखो भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. याच बरोबर व्हीव्हीआयपी देखील मोठ्या प्रमाणात इथं येत असतात.साई मंदिर आणि परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं साईबाबा मंदिरासाठी स्पेशल बीडीडीएस पथक तैनात करण्यात आले आहे.
साईबाबांच्या मंदिरात होणाऱ्या पहाटेच्या काकड आरती,मध्यान्ह आरती आणि धुपाआरती तसंच रात्रीच्या शेजाआरतीच्या अगोदर साईंच्या समाधी मंदिरासह परिसरातील सर्वच मंदिरात बीडीडीएस पथकाकडून तपासणी केली जाते.