अहिल्यानगर (दि.२२ जानेवारी):-पाथर्डी येथे मावा व सुगंधीत तंबाखु विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीकडून 3 लाख 82,000/-हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार हे पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढत असताना पथकास गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे शहानूर शेख व मोहिद्दीन शेख (रा.प्रभु पिंपरी,ता.पाथर्डी) हे एका खोलीमध्ये सुगंधीत तंबाखु मिश्रीत मावा मशीनच्या सहाय्याने तयार करून विक्री करतात.
पथकातील पोलीस अंमलदारांनी पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता एका खोलीत दोन इसम तंबाखु व सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव बबलू छबु सय्यद (वय 24, रा.पागोरी पिंपळगाव, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर), आदिलखान शेरखान पठाण (वय 24, रा.पागोरी पिंपळगाव, ता.पाथर्डी) असे असल्याचे सांगीतले. पथकाने घटना ठिकणावरून 3,82,000/-रू. किंमतीचा मुद्देमाल त्यात विविध रंगाचे सुगंधित तंबाखु पुडे,35 किलो तंबाखु व सुपारी मिश्रीत मावा,100 किलो बारीक सुपारी,एक इलेक्ट्रीक लोखंडी मशीन,एक इलेक्ट्रीक वजन काटा, दोन मिक्सर व चुना पॅकेट असा मुद्देमाल जप्त केला आहे.तपास पथकाने ताब्यातील आरोपीकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या मालकी बाबत विचारपूस केली असता त्याने जप्त केलेला मुद्देमाल हा शहानूर मोहिद्दीन शेख (फरार),मोहिद्दीन हसन शेख (फरार) दोन्ही (रा.पागोरी पिंपळगाव, ता.पाथर्डी) याचे मालकीचा असले बाबतची माहिती सांगीतली आहे.
वर नमूद आरोपी विरूध्द पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुरनं 72/2025 बीएनएस 2023 चे कलम 123, 223,274,275,3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार गणेश लोंढे, शिवाजी ढाकणे,मयूर गायकवाड यांनी केलेली आहे.