राहाता प्रतिनिधी:-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत विविध जिल्हा परिषदेच्या शाळेत ६० प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत.तसेच या प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ ६ महिन्यांच्या करारावर आहे.
सहा महिने झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होतील त्यामुळे आम्हाला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी सेवेत कायम घेण्यात यावे किंवा आमचा करार कालावधी वाढवून मिळावा व आमचे माहे नोव्हेंबर,डिसेंबरचे अद्यापही पगार जमा झालेले नाही तरी आमचे पगार लवकरात लवकर जमा करावे किंवा आमची इतर ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी ६० प्रशिक्षणार्थींनी ता.२४ जानेवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.