अहिल्यानगर (दि.२४ जानेवारी):-गणराज्य दिना निमित्त भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेला भुईकोट किल्ला २६ जानेवारी २०२५ रोजी नागरीकांना पाहणेकरीता खुला करण्यात येत असल्याने सदर दिवशी आसपासचे गावातील तसेच अहिल्यानगर व भिंगार शहरातील नागरीक लहान मुले महिला भुईकोट किल्ला पाहणेकरीता मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता असुन,त्यावेळी नागरीकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.
त्यातच अहिल्यानगर पाथडी हा महामार्ग अहिल्यानगर शहरातुन जात असल्याने गर्दीच्या कालावधीत वाहतुकीमुळे नागरीकांची गैरसोय होवु नये तसेच नागरीकांची सुरक्षिततेस धोका पोहोचुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९.०० वा. ते १८.०० वा.पर्यंत अहिल्यानगर पाथर्डी मार्गावरील भुईकोट किल्ला व परीसरातुन जाणारऱ्या खाजगी,प्रवासी व सर्व प्रकारच्या माल वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या वाहतुक मार्गामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्याचे नियोजित आहे.
१)अहिल्यानगर शहराकडून पाथडीकडे जाणाऱ्या वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग
> चांदणी चौक-निंबोडी सारोळा बध्दी बायपास लिंक रोड मार्गे पाथर्डी कडे
२)पाथर्डी कडुन अहिल्यानगर शहराकडे येणाऱ्या वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग
> चांदबीबी महाल वायपास लिंक रोड सारोळा बच्दी जामखेड रोड-निंबोडी चांदणी चौक मार्गे
उपरोक्त आदेशचे पालन करून नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्या करणे बाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अवाहन केले आहे.