अहिल्यानगर (दि.२५ प्रतिनिधी):-मुख्यमंत्री १०० दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांच्या तक्रार दिनाचे कोतवाली पोलीस ठाण्यात आज आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती,कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की,या तक्रार दिनात जो तक्रारदार आहे त्याची अडीअडचण आपण समजून घेतो व जी कायदेशीर कारवाई आहे ती तातडीने आपण पार पाडतो.आज तक्रार दिनाचा दुसरा आठवडा असून प्रत्येक शनिवारी हा कार्यक्रम चालूच राहणार आहे व लोकांचे वादविवाद,तक्रार जागेवर मिटल्याने त्यांना समाधान वाटले तक्रारीचे निरसन झाले. हा कार्यक्रम सकाळी कोतोली पोलीस ठाण्यात ११ ते १ वा. दरम्यान पार पाडला.
११८ अर्जदार गैर अर्जदार तसेच तेरा पब्लिकन्सी मधील फिर्यादी व सामनेवाला यांना समक्ष बोलून तक्रारदार यांच्या तक्रारीचे निरसन केले असून तक्रारदार व अर्जदार यांनी पोलीस प्रशासनाचे यावेळी आभार मानले.
