अहिल्यानगर (दि.२५ जानेवारी):-नाशिक जिल्ह्यातील शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या राष्ट्रीय उपक्रमशील संस्थेच्या मार्फत सामाजीक,शैक्षणिक, सांस्कृतिक,उदयोजक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणुन राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार सन १९९८ पासुन देण्यात येत आहे.२०२३-२०२४ वर्षाचा राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार संस्थेच्या वतीने या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांना जाहीर करण्यात आला.
संस्थेमार्फत शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा २५ जानेवारी २०२५ रोजी पुरस्कार प्रदान सोहळा महाकवी कालिदास कलामंदीर,शालीमार, नाशिक या ठिकाणी सकाळी 11.00 वा.आयोजीत करण्यात आला होता.शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमा प्रसंगी मा.आ.श्री.डॉ.सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.२०२३-२०२४ वर्षाचा राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉ.बी.जी.शेखर पाटील मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक तथा साहित्य व सांस्कृतिक मंडळ संविधानिक सदस्य, महाराष्ट्र राज्य व वीरपत्नी सन्मा.हर्षदाताई खैरनार यांचे शुभहस्ते पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन श्री.रविंद्र जाधव आयुक्त मालेगाव महानगरपालीका व श्री.संतोष मराठे, सामाजिक कार्यकर्ते बोईसर,मुंबई हे उपस्थित होते.पुरस्कार प्रदान सोहळयामध्ये पुरस्कार स्विकारून पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच पुरस्कार प्रदान करून सन्मानीत केलेबाबत शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.