अहिल्यानगर (दि.२७ प्रतिनिधी):-मित्रांच्या मदतीने प्रेमाचे जाळयात ओढुन एकास लुटले,आरोपी महिलेच्या 3 साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीडमधून जेरबंद करण्यास यश आले आहे.फिर्यादी श्री.सुरेंद्र विश्वासराव पिंपरकर, (रा.पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) व त्यांची मैत्रीण असे एमआयडीसी परिसरात असताना 3 अज्ञात आरोपीतांनी फिर्यादीस मारहाण करून एक लाख रूपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.तसेच फिर्यादीचे व त्यांचे मैत्रिणीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन,पैशाची मागणी केली.याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं 36/2025 बीएनएस कलम 309 (4), 308 (3), 115 (2) सह प्रमाणे खंडणीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अधिकारी व अंमलदार तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा मयुर ढोले (रा.बीड) याने त्याचे साथीदारासह केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.पथकाने मिळालेल्या माहितीवरून संशयीत इसमांचा बीड शहरामध्ये शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1)मयुर मधुकर ढोले, वय 27,रा.सुयोग अपार्टमेंट,शिवाजीनगर, बीड 2)अभिजीत शंकर गलधर,वय 27, रा.सिध्देश्वर, एमआयडीसी बीड 3) नितीन स्वामी डांगरे,वय 26,रा.बुरूडगल्ली, हिरालाल चौक,बीड असे असल्याचे सांगीतले. पथकाने ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन,विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा 4)प्रियंका पांडुरंग ढलपे,रा.बीड (फरार) हिचे मदतीने केल्याची माहिती सांगीतली.आरोपी मयुर मधुकर ढोले याने सांगीतले की,त्याची मैत्रीण प्रियंका पांडुरंग ढलपे,रा.बीड ही सध्या विळदघाट परिसरात नोकरीस आहे.
तिचे नोकरीच्या ठिकाणी असलेले सुरेंद्र विश्वासराव पिंपरकर, रा.पाईपलाईन रोड, अहिल्यानगर यांचेशी तिची चार-पाच महिन्यापासुन ओळख असून सुरेंद्र पिंपरकर यास प्रेमाच्या जाळयात अडकवून त्यास फसवणुक त्याचे कडून पैसे काढायचे असे ठरले.त्यानुसार प्रियंका पांडुरंग ढलपे ही दि.24 जानेवारी रोजी सुरेंद्र विश्वासराव पिंपरकर यास नाथकृपा ट्रान्सपोर्ट, एमआयडीसीच्या पटांगणात घेऊन गेली त्यावेळी आरोपी हे लाल रंगाच्या आय टेन कार क्रमांक एमएच-02-बीटी-7423 मधुन नमूद ठिकाणी गेले.आरोपीतांनी दोघांचे फोटो व व्हिडीओ काढुन फिर्यादीस व्हीडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, मारहाण केली.आरोपीतांनी बळजबरीने फिर्यादीचे मोबाईल फोन पे वरून मयुर मधुकर ढोले याचे मित्राचे फोन पे वर एक लाख रूपये ट्रान्सफर करून घेतले असल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीस गुन्हयाचे तपासकामी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. संपतराव भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संदीप पवार,सुरेश माळी, पंकज व्यवहारे,फुरकान शेख,प्रशांत राठोड व महादेव भांड यांनी केली आहे.