अहिल्यानगर प्रतिनिधी:-महाराष्ट्रातील भाजपा सदस्य अभियाना अंतर्गत अहिल्यानगरचे भाजपा उपाध्यक्ष तथा ॲड.मा.नगरसेवक धनंजय जाधव यांनी शहरातील प्राथमिक १००० सदस्य नोंदणी करून उद्दिष्ट पूर्ण केले.
याबाबत राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ॲड.धनंजय जाधव यांना पत्र पाठवून म्हटले की,आपण संघटनपर्वात किमान १००० सदस्य भाजपा सोबत जोडून आपण संघटना बळकट केलीच आहे.शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूत ही आपण जोडून घेतलेले आहे.आपल्या या योगदानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन,तसेच यावेळी धनंजय जाधव म्हणाले की,मी अहिल्यानगर शहरातील प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचे एक हजार उद्दिष्ट पूर्ण केले.
ही नोंदणी माझ्यासाठी केवळ एक संख्या नसून पक्षाच्या विचारधारेची अनेकांना जोडण्याचे एक संकल्प आहे.आता निर्धार आहे की अजून अधिक लोकांना मार्गदर्शन करून भारतीय जनता पक्षात सामील करून घेण्याचे कार्य सातत्याने करत राहणार.