संगमनेर प्रतिनिधी/राजेंद्र मेढे:- संगमनेर तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे व्यापारी पेठेचे गाव चिंचोली गुरव या गावाच्या सुपुत्राने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
512 आर्मी बेस वर्कशॉप किरकी येथे सिव्हिल डिफेन्स मध्ये कार्यरत असलेले श्री.विलास त्रिंबक सोनवणे यांना भारतीय लष्कर दिनाच्या निमित्त पुणे येथे झालेल्या आर्मी परेड मध्ये विशेष,उल्लेखनीय तसेच क्षेपणास्त्राचे विविध मॉडेल विविध statue रणगाड्यासाठी लागणाऱ्या trackpad मध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल 512 आर्मी बेस वर्कशॉप मधील mfg ग्रुपचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सिन्हा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले.
सोनवणे यांनी केलेल्या कामगिरीबद्दल गावाचे नाव उंचावले आहे. गावात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे त्यांचा सर्व गावकऱ्यांच्या वतीने एक भव्य दिव्य असा सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.