अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेतामधुन तुर पिक चोरीच्या गुन्हयातील 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत आरोपी कडून 2 लाख 90,000/-रु.किं.मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी श्री.माणिक अंकुश काळे (रा.रांजणगाव मशीद,ता.पारनेर) यांनी घराजवळील शेतामध्ये वाळविण्यासाठी प्लॉस्टीक कागदावर टाकलेली तुर अज्ञात चोरटयांनी फिर्यादीचे संमतीशिवाय स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता चोरून नेली होती.याबाबत सुपा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 25/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने घटना ठिकाणी भेट देवुन,गुन्हयातील चोरीस गेला माल व आरोपीची माहिती घेत असताना पोहेकॉ/अतुल लोटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नामे अनिल हरीभाऊ गोलवड व त्याचे साथीदारासह केला असुन ते मांडवगण ता.श्रीगोंदा परिसरात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मांडवगण,ता.श्रीगोंदा परिसरात शोध घेऊन संशयीत इसमास ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1)अनिल हरीभाऊ गोलवड, वय 45, रा.कामठी, ता.श्रीगोंदा 2)संतोष सुधाकर चौरे, वय 42, रा.मांडवगण, ता.श्रीगोंदा 3)जालिंदर रावसाहेब गोलवड, वय 25, रा.कामठी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
आरोपीकडे वर नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार 4) संजय भाऊसाहेब गोलवड, रा.कामठी, ता.श्रीगोंदा (फरार) 5) संतोष भाऊसाहेब गोलवड, रा.कामठी, ता.श्रीगोंदा (फरार), 6) राहुल बाळु पवार, रा.रांजणगाव मशीद, ता.पारनेर (फरार) 7) लहु भागाचंद पवार, रा.रांजणगाव मशीद, ता.पारनेर (फरार) अशांनी मिळून केल्याची माहिती सांगीतली.पथकाने ताब्यातील आरोपीस गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी चोरलेली 20 क्विंटल तुर ही आडते व्यापारी अशोक सुपेकर, मिरजगाव,ता.कर्जत यांना स्वत:ची म्हणुन विकल्याची माहिती सांगीतली.तपास पथकाने पंचासमक्ष आडते व्यापारी अशोक राधाकिसन सुपेकर यांनी हजर केलेली 1,40,000/- रू किंमतीची 20 क्विंटल तुर व गुन्हयात वापरलेला 1,50,000/- रू किंमतीचा एमएच-17-बीवाय-6274 हा मालवाहु टेम्पो असा एकुण 2,90,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपींना सुपा पोलीस स्टेशन गुरनं 25/2025 बीएनएस कलम 303 (2) चे तपासकामी मुद्देमालासह सुपा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.संपतराव भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार अतुल लोटके,गणेश लोंढे,संतोष खैरे,सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, मेघराज कोल्हे व महादेव भांड अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील यांनी केलेली आहे.