मुंबई प्रतिनिधी(प्रियंका गजरे):-दि.२६ जानेवारी रोजी श्री साई युवा मित्र मंडळ भाईंदर(पूर्व) माघी जयंती निमित्त मंडळाकडून टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बांद्रा अध्यक्ष सुमित(भाऊ) मोरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सुमित भाऊ मोरे म्हणाले की श्री साई युवा मित्र मंडळाचे काम नेहमीच समाजाच्या हितासाठी व समाजाच्या कल्याणासाठीच प्रेरणादायी ठरलेले आहे. तसेच या मंडळातील सर्व कार्यकर्ते हे गोरगरीब लोकांची सेवा करण्यासाठी नेहमीच म्हणजेच वर्षभर चोवीस तास उपलब्ध असतात हे कार्य त्यांचे खरेच कौतुकास्पद आहे.व तसेच माघी जयंती निमित्त मंडळाकडून मला आमंत्रण दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे व तसेच भविष्यात टायगर ग्रुपच्या माध्यमातून मंडळासाठी व नागरिकांसाठी कोणतीही मदत लागली त्यास मदत करण्यास आम्ही चोवीस तास कटिबद्ध आहोत,असे ते यावेळी म्हणाले.या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य प्रभुती नार्वेकर,किरण जाधव,भाऊ उगले,तुषार नवले,विजय शिंदे,रुपेश कासारे,योगीराज चव्हाण, दिपक वैती व दिनेश लिडिया उपस्थित होते.

