नेवासा प्रतिनिधी (दि.२७ जानेवारी):-डायल 112 वर फोन करून गावात खुन झाल्याची खोटी माहीती देणाऱ्या तुकाराम बाबुराव गोरे वय 29 (रा.वरखेड ता. नेवासा) येथील रामडोह येथील तरुणावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत माहिती अशी क दि.26 जानेवारी 2023 रोजी 07.49 वाजता डायल 112 वर तुकाराम नावाने मोबाईल क्र.7620197893 वरुन कॉल आला कि वरखेड गावामध्ये खुन झाला आहे. त्यावरुन पोलीस निरीक्षक विजय करे यांचे आदेशावरुन सदर ठिकाणी पोसई/मोंढे, पोना/संजय माने,पोना/अशोक कुदळे असे वरखेड ता.नेवासा येथे गेल्यावर सदर इसमाचे नाव तुकाराम गोरे व तो रामडोह येथील असले बाबत माहती मिळाली. रामडोह येथे कॉलर तुकाराम गोरे यांच्या राहते घरी गेले असता इथे कोणत्याही प्रकारचा खून अथवा गुन्हा घडलेला नव्हता. तेथील उपस्थित असलेल्या इसमाला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव तुकाराम बाबुराव गोरे असे सांगितले त्याच्या तोंडाचा आंबट व उग्र वास येत असल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारूचा नशेत असले बाबत डॉक्टरांनी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले.सदरील खोटी माहीती देणारा आरोपी तुकाराम बाबुराव गोरे (वय 29 वर्षे) रा. वरखेड ता.नेवासा याचे विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन येथे गुरनं.73/2023 भादंविक 177 सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 85-1 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
