अहमदनगर प्रतिनिधी (दि.२७ जानेवारी):-दि.२६ जानेवारी २०२३ रोजी भारताच्या ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस मुख्यालय येथे जिल्हा स्तरावरील होणाऱ्या संचलनामध्ये स्नेहालय संचलित *बालभवन* आणि *संजयनगर पुनर्वसन प्रकल्प* यांच्या संयुक्त माध्यमातून संजयनगर सेवा वस्तीतील *वीर डिफेन्स फोर्स* च्या एकूण २५ मुला-मुलींनी सहभाग नोंदवला आहे.तसेच *उडान* बालविवाह प्रतिबंधक अभियान आणि *चाईल्ड लाईनच्या* माध्यमातून बालविवाह जनजागृती चित्ररथ मार्फत जनजागृती करण्यात आली.उडान अभियाना माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात ३५० पेक्षा जास्त बालविवाह थांबवण्यात आले आहे.या अभियाना मार्फत *”अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा”* करण्याकरिता जिल्ह्यात जनजागृती करण्याचे काम सुरू आहे.अहमदनगर जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करणाऱ्या स्नेहालय संस्थेने २००३ मध्ये संजयनगर मध्ये बालभवन प्रकल्पाची सुरुवात केली.गरिबी,शोषण, गुन्हेगारी,विषमता,मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव, व्यसनाधीनता,अशा विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या या बालकांना शिक्षण व संस्कार देण्यासह आदर्श विद्यार्थी घडवणे,आदर्श कुटुंब घडवणे, आदर्श पालक घडवणे व आदर्श सेवावस्ती (झोपडपट्टी) घडवणे,या उद्देशाने बालभवनचे काम अहमदनगर शहरातील ८ झोपडपट्ट्यांमध्ये सुरू आहे. स्नेहालय अंतर्गत चालणारे संजयनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत २९८ घरकुल प्रकल्प चे काम सुरू आहे.संजयनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प,बालभवन, चाईल्ड लाईन आणि उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान,या प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने बालकांना स्वतःचे रक्षण स्वतः करता येईल या दृष्टिकोनातून *”वीर डिफेन्स फोर्स”*हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि त्यांना स्वावलंबन करण्यासाठीचे हे त्रिसूत्री उद्दिष्ट समोर ठेवून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या माध्यमातून मुलांना भूदल,नौदल आणि वायुदल मध्ये ऑफिसर बनण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.तसेच इतर क्षेत्रात त्यांना प्राथमिक माहिती देऊन आपले स्वप्ने साकार करण्यासाठी तयार केले जात आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून दि.२६ जानेवारी २०२३ रोजी भारताच्या ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालय येथे जिल्हा स्तरावरील होणाऱ्या संचलनामध्ये स्नेहालय संचलित बालभवन आणि संजय नगर पुनर्वसन प्रकल्प यांच्या संयुक्त माध्यमातून संजयनगर सेवा वस्तीतील एकूण २५ मुला मुलींनी सहभाग घेऊन तेथील शिस्तीचे प्रदर्शन स्वतः प्रत्यक्षात आत्मसात मुलांनी केले आहे.या संचलनामध्ये श्रीरामपुर पोलीस विभागीय पोलीस उपाधीक्षक श्री.संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण संचलन एकजुटीने, शिस्तबद्ध,उत्साहात पार पाडले.अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,पोलीस अधीक्षक राकेश ओला,सर्व पोलीस प्रशासन,शासकीय यंत्रणाचे अधिकारी व कर्मचारी,विविध शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी,वेगवेगळ्या वृत्तपत्राचे,चॅनलचे पत्रकार यांच्या समोर मुलांनी संचलन व चाईल्ड लाईनचे बालविवाह प्रतिबंध अभियानाचे चित्ररथ प्रदर्शन झाले.यावेळेस उपस्थित असणारे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निम शासकीय यंत्रणा,नागरिक यांनी मुलांच्या संचलन आणि चित्ररथला भरभरून टाळ्याच्या गजरात प्रतिसाद दिला,अशा प्रकारे आज आगळ्यावेगळ्या प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
*संचलनामध्ये या मुला मुलींचा सहभाग….*
1.ऋषिकेश संतोष बोखारे
2.फरान सलीम पठाण
3.पवन भिका भडांगे
4.मुस्कान अमरसिंग जुनी
5.ममता आत्मासिंग भोंड
6.रोहित संतोष देवगन
7.सुनिता कमलसिंग जुनी
8.संजना सिकंदर जुनी
9.अंजली समलसिंग जुनी
10.अनमोल अमरसिंग जुनी
11.साक्षी विनोद झाकीरवार
12.कोमल गोलासिंग टाक
13.ईश्वर कल्याण जोगदंड
14.ओमकार दशरत शिंदे
15.सागर दत्तू काळे
16.संग्राम संजय शिंदे
17. ज्योती समलसिंग जुनी
18.संतोष दत्तू काळे
19.आरती आत्मासिंग भोंड
20.सृष्टी कल्याण जोगदंड
21.सीमा जीतसिंग जुनी
22.फईम नदीम शेख
23.रोहित राजु इंगळे
24.मनीषा मिलनसिंग जुनी
25.संजना जुनी

