वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):- तूळजापूर-वघाळा येथील जि.प.प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसंगी उपरोक्त समितीचे पदाधिकारी यांनी पर्यावरण संवर्धन व विकास या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.या वेळी समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पञकार गजानन जिकार,सेलू तालुकाध्यक्ष विजया रोकडे,मुख्याध्यापक एम.एन.देशमुख सर,अंगणवाडी सेविका आशा जिकार,सोनू मोहदूरे,सोनू बैस,वंदना भोयर,उषा झाडे,रोशन बैस,प्रणय मोहदूरे,अविनाश येडे आदी या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
