वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):-यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,सेवाग्राम व भागशाळा खरांगना (गोडे) येथे दि.२६/०१/२०२३ गुरूवारी ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सतिशराव राऊत (उपाध्यक्ष,यशवंत ग्रामिण शिक्षण संस्था,वर्धा) हे होते. प्रमुख अतिथी महाविद्यालयातील प्राचार्य श्री. प्रभाकरराव टेकाडे, सौ.सुरेखाताई भोमले (माजी मुख्याध्यापक,यशवंत माध्यमिक कन्या शाळा, देवळी), पर्यवेक्षिका सौ.वंदना राऊत,शिक्षक प्रतिनिधी श्री.संजय देशमुख,जेष्ठ शिक्षिका सौ.अनिता भिसे,कु. शीला खाडे (सेवा निवृत्त, शिक्षिका यशवंत विद्यालय, सेवाग्राम),मेहबुब शेख (जेष्ठ नागरीक),श्री.राजुभाऊ नागतोडे ( सदस्य, ग्राम पंचायत, नांदोरा) सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सर्व प्रथम मान्यवराच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. महाविद्यालयातील प्राचार्य श्री. प्रभाकरराव टेकाडे साहेब यांनी ध्वजारोहन केले. ध्वजारोहनाचे सुत्रसंचालन क्रिडा शिक्षक श्री. अभय वाघ यांनी केले. १० वी च्या परीक्षेमध्ये व विविध स्पर्धेमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिके देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन जोत्स्ना राऊत व श्रीमती उज्वला इंगळे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील प्राचार्य श्री.प्रभाकरराव टेकाडे यांनी केले तर आभार श्री.संजय देशमुख यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
