वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):- लायन्स क्लब गांधी सिटी व साई सेवा मंडळ व एक्यूप्रेशर रिसर्च ट्रेनिंग ट्रीटमेंट संस्थान जोधपूर राजस्थान द्वारा एक्यूप्रेशर , वाईब्रेशन सुजोक चिकित्सा शिबिराचे आयोजन साई मंदिर परिसरात करण्यात आले.या प्रसंगी लायन्स क्लब गांधी सिटीचे संचालक अनिल नरेडी,अध्यक्ष संदीप चिचाटे,सचिव आशिष पोहाणे,उपाध्यक्ष स्वाती चुटे,समाजिक कार्यकर्ते राजेंद्र कळसाईत,अशोक कांबळे,राजेंद्र सारण,एचआर चौधरी,साई मंडळचे अध्यक्ष घनश्याम सावरकर,उपाध्यक्ष विठ्ठल व्यवहारे,सचिव सुभाष राठी यांची प्रमुख उपस्थिती होती.दिनांक २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात बिना औषधाने इलाज केल्या जाणार आहे.टोणगळ्याचा त्रास,लठ्ठपणा,ब्लड प्रेशर, सुगर,मानसिक तणाव,पुराणा सर दर्द,लकवा इत्यादी बिमारिचा इलाज केला जाणार आहे.या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
