‘त्या’ प्रतिष्ठित क्लबमध्ये रंगला होता तिरट जुगाराचा डाव.. स्थानिक गुन्हे शाखेने मारली रेड 16 आरोपी ताब्यात घेत तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- राहता तालुक्यात साकुरी येथील ऍ़क्टीव्ह सोशल क्लबमध्ये रमी पत्त्याचे नावाखाली तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या 18 आरोपीकडून 14 लाख 16 हजार 840/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व राहाता पोलीस स्टेशन यांना यश आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशान्वये व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहाता पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत इसम नामे सचिन बनसोडे,रा.साकुरी, ता.राहाता हा ऍ़क्टीव स्पोर्टस क्लब,साकुरी येथे नोंदणी केलेल्या क्लबमध्ये रमी पत्त्याचे नावाखाली तिरट नावाचा पत्त्यांवर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवित आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली.पथकाने मिळालेली माहिती पोनि/नितीन चव्हाण, राहाता पोलीस स्टेशन यांना कळवून पथक,पोनि/नितीन चव्हाण व राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अशांचे संयुक्त पथक कारवाईसाठी रवाना झाले.
पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या बातमीतील कातनाला, साकुरी, ता.राहाता येथील ऍ़क्टीव्ह स्पोर्टस क्लब येथे छापा टाकला असता येथील एका रूममध्ये दोन ठिकाणी काही इसम तिरट नावाचा पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले.छाप्या दरम्यान दोन इसम पळून गेले.उर्वरीत इसमांना त्याच ठिकाणी थांबण्यास सांगुन त्यांना पत्यांचा डाव कोण खेळवित आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सचिन योसेफ बनसोडे हा पत्त्याचे क्लबचा मालक असल्याचे सांगीतले.सदर ठिकाणी जुगार खेळणारे इसमांकडे विचारपुस करता त्यांनी सदर क्लबमध्ये रमी पत्त्यांचे नावाखाली पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा हार जीतीचा जुगार खेळत असल्याने सांगीतले.पथकाने सदर ठिकाणी दोन डावामध्ये खेळत असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांचे नाव 1) गणेश विठठल जेजुरकर, वय 35, रा.राहाता, ता.राहाता 2) कैलास अशोक मंजुळ, वय 29, रा.कोपरगाव, ता.कोपरगाव 3) इक्बाल सैफु शेख, वय 35, रा.शिर्डी, ता.राहाता 4) अक्षय आप्पासाहेब खोतकर, वय 26, रा.खंडोबा गल्ली, राहाता 5) सचिन मधुकर बारे, वय 35, रा.विजयनगर, सिन्नर, जि.नाशिक 6) ज्ञानदेव नामदेव गव्हाणे, वय 42, रा.आडगाव, ता.राहाता 7) विजय अगस्तीन वाघमारे, वय 50, रा.पिंपळस, ता.राहाता 8) भाऊसाहेब रामराव चौधरी, वय 35, रा.रूई, ता.राहाता 9) संदीप सुधाकर अभंग, वय 28, रा.पळाशी, ता.नांदगाव, जि.नाशिक 10) सचिन योसेफ बनसोडे, वय 26, ता.साकुरी, ता.राहाता 11) महेश हरी लोखंडे, वय 23, रा.पिंपळस, ता.राहाता 12) अनिस नसीर शेख, वय 50, रा.कोल्हार, ता.राहाता 13) वसंत लक्ष्मण वडे, वय 64, रा.येवला, ता.येवला, जि.नाशिक 14) समीर रफिक पटेल, वय 22, रा.कोल्हार, ता.राहाता 15) मनोज लक्ष्मण मोरे, वय 48, रा.साकुरी, ता.राहाता 16) सोमनाथ लक्ष्मण भगत, वय 44, रा.घोटी, ता.इगतपुरी, जि.नाशिक 17) उत्तम रामराव कोळगे, वय 58, रा.नांदुर्खी, ता.राहाता 18) हमराज सर्फराज कादरी, वय 55, रा.शिर्डी, ता.राहाता असे असल्याचे सांगीतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी हे तिरट नावाचा हार जीतीचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आल्याने त्यांची अंगझडती घेऊन त्यांचे ताब्यातुन एकुण 14,16,840/- रू किं.त्यात रोख रक्कम,मोबाईल,मोटार सायकल,कार,डीव्हीआर असा मुद्देमाल जप्त केला.
ताब्यातील आरोपी विरूध्द राहाता पोलीस स्टेशन गुरनं 72/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ), 4 , 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पुढील कायदेशिर कारवाई राहाता पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संतोष लोढे, सोमनाथ झांबरे,संतोष खैरे, रोहित येमुल,शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे यांनी केलेली आहे.