संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-१ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे.पीकविमा,हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई-पीकपाहणी आवश्यक असून,शेतकरी स्तरावरील नोंदणीची मुदत संपल्यानंतर तलाठी लॉगीन वरून हिवरगाव पावसा येथे ई-पीक पाहणी डीसीएस मोबाइलद्वारे कर्मचाऱ्यांमार्फत तलाठी लॉगिन वरून चालू आहे.ई-पीक पाहणी यंदाच्या रब्बी हंगामापासून ई-पीक पाहणी नोंदीसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) Digital Crop Survey मोबाइल ॲपच्या माध्यमातून शेतकरी व सहायक स्तरावरून पिकांची नोंद केली जात आहे.
यात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊनच मोबाइल ॲपमध्ये पिकांचे फोटो अपलोड करून माहिती भरावी लागत आहे.सध्या शेतकरी स्तरावरून ई-पीक पाहणी मुदत संपली आहे.उर्वरित खातेदारांची ई-पीक पाहणी कर्मचाऱ्यांमार्फत डीसीएस मोबाइलद्वारे त्यांच्या लॉगिनने पूर्ण करण्याचे काम सर्वत्र चालू आहे.त्यानुसार हिवरगाव पावसा येथे ई-पीक पाहणी शंभर टक्के पीक पाहणी नोंदणीसाठी सहाय्यक चंद्रकांत भालेराव हे मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत.सहाय्यक चंद्रकांत भालेराव हे शेतकऱ्यांला संपर्क साधून गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाइल ॲपच्या माध्यमातून पिकांचे फोटो घेऊन शंभर टक्के नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.गाव नमुना १२ वर होणार नोंद शेतकरी स्तरावरून नोंदवण्यात आलेल्या पीक नोंदी पैकी १०० टक्के पडताळणी सहायक स्तरावरून करण्यात येणार आहे.सहायक स्तरावरून नोंदविण्यात आलेल्या नोंदीची १०० टक्के पडताळणी ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत होणार आहे. त्यानंतर ई-पीक पाहणी गाव नमुना १२ वर प्रतिबिंबित करण्यात येणार आहे.त्यामुळे उर्वरित खातेदारांनी ई-पीकपाहणी कर्मचाऱ्यांमार्फत डीसीएस मोबाइलद्वारे त्यांच्या लॉगिन वरून पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन हिवरगाव पावसा गावातील शेतकऱ्यांना कामगार तलाठी पूनम वैदकर व सरपंच सुभाष गडाख यांनी केले आहे.