अहिल्यानगर (दि.21 प्रतिनिधी):- अहिल्यानगर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल भारती यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की, शहरातील दिल्लीगेट परिसरात दोन संशयित इसम हे गावठी कट्टा घेऊन फिरत आहेत.याबाबत श्री.भारती यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती देऊन सदर ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पाठवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले.
कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे दिल्लीगेट परिसरात इसमांचा शोध घेत असताना ते मिळून आले त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांचे नाव प्रफुल्ल अनिल मिरपगार,सिमोन जनार्दन मीर पगार (दोन्ही रा.मिरी ता.पाथर्डी, हल्ली रा.दिल्लीगेट) असे सांगितले.त्या दोघातील एकाकडे अग्नीशस्त्र सदृश्य गॅस लाइटर मिळून आले.त्यांना कोतवाली पोलीस स्टेशनला आणून त्यांचा मूळ पत्ता हा पाथर्डी असल्याने पाथर्डी पोलीस स्टेशनला विचारपूस केली असता प्रफुल्ल मीरपगार याच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे माहिती कळाली, त्यांना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक कैलास कपिले,पोहेकॉ/योगेश भिंगारदिवे,विशाल दळवी,संदीप पितळे,सलीम शेख,दीपक रोहकले,तानाजी पवार,अभय कदम,अतुल काजळे,सुरज कदम,सचिन लोळगे,अमोल गाडे,संकेत धीवर,राम हंडाळ, विजय गावडे यांनी केली आहे.