नगर (प्रतिनिधी):-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धर्मदाय उपायुक्त यांना दि.20 फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले आहे यात म्हटले आहे की,धर्मादाय रुग्णालयामध्ये रुग्णांसह नातेवाईकांची ही मोठी आर्थिक लूट होत आहे या सर्व धर्मदाय रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
यावेळी यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे,जिल्हा सल्लागार जे डी शिरसाठ,शहराध्यक्ष हनीफ शेख,शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे,भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे,पी.के.गवारे,संजय शिंदे,पिणू भोसले,एकनाथ गायकवाड,प्रकाश साळवे,देविदास भालेराव,प्रतीक जाधव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालय मध्ये उच्च न्यायालयाने आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन होत आहे. या रुग्णालयांमध्ये आर्थिक उत्पन्न कमी असलेले व दारिद्र्य रेषा खालील कुटुंबांना मोफत उपचार पद्धती मिळावे यासाठी शासनाने धर्मदाय रुग्णालय यांना कर सवलत देऊन लोकसेवा करण्यासाठी गरीब,वंचित नागरिकांना उपचार मोफत व कमी दरामध्ये मिळावा यासाठी प्रयत्न करत असते परंतु धर्मदाय कार्यालयात नोंदणीकृत धनदांडग्य रुग्णालय हे रुग्णांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून रुग्णाच्या परिस्थितीचा फायदा घेत अवाजावी रक्कम सह अनामत रक्कम घेताना अनेकदा आढळून आलेले आहे. त्यांची कुठलीही अधिकृत नोंद.रुग्णालयाच्या दप्तरीमध्ये कुठल्याही प्रकारचे रुग्णांची अधिकृत नोंद नसून त्याचे धर्मदाय रुग्ण म्हणून केलेले असते.
अशी माहिती रुग्णास किंवा त्यांच्या नातेवाईकांना नसते उच्च न्यायालय व त्यांच्या निर्देशाचे उल्लंघन आणि राज्य शासनाचे महसूल बुडवण्याचा प्रकार सर्रासपणे होत आहे मागील वर्षी 2024 ला आनंदऋषी रुग्णालय मध्ये दुर्गम भागातील एका कुटुंबातील कर्ता व्यक्तीस किडनी स्टोन ऑपरेशन करिता दाखल केले असताना त्यांच्याकडून अनामत रक्कमे सह विविध टेस्ट करण्यासाठी आणि औषध घेण्यासाठी दमदाटी करीत अरेरावेची भाषा वापरत पैसे उकळण्यात आले. या प्रकरणात धर्मदाय रुग्णालय निरीक्षक आणि धर्मादाय उपायुक्त यांनी पत्राद्वारे सूचित करून देखील तेथील प्रशासकीय अधिकारी आशिष भंडारी आणि त्यांच्या सहकारी यांनी त्या लेखी आदेशाचे पालन न करता अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली या संबंधित अधिकाऱ्याशी आर्थिक हितसंबंध चांगले आहेत त्यांच्याबरोबर येथील राजकीय पुढारी देखील आमच्या संबंधात आहे असे म्हणत तुम्हाला आम्ही सांगू तेवढे पैसे भरावेच लागतील असे तेथील कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी म्हणतात अत्यंत हिन प्रकारची वागणूक आनंदऋषी रुग्णालयामध्ये रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास दिला जात आहे.
या सर्व घटनेचे संबंधित कुटुंबाकडे व वंचित बहुजन आघाडीकडे पुरावे देखील आहेत प्रकारे असे अनेक घटना धर्मादाय रुग्णालयांमध्ये होत असतात. आनंदऋषी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे महंत आनंद ऋषी यांच्या सामाजिक कार्यास व चरित्राला काळीमा फासत आहे.अशाच प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व धर्मदाय रुग्णालयांमध्ये निर्देशांचे पालन होत नाही रुग्णांना व नातेवाईकांना राहण्याची सोय उपलब्ध नसते त्यांना जेणेकरून रुग्णालयातच उघड्यावर झोपावे लागते त्यामुळे त्यांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतेच तसेच रुग्णाची आर्थिक नुकसान देखील होते धर्मदाय रुग्णालयांना रुग्णाचे नातेवाईकांसाठी राहण्याची व कमी दारात जेवण्याचे चांगले उत्तम सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत धर्मदाय कार्यालयाकडून नेमलेले रुग्णालयामधील प्रशासकीय अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून प्रशासकीय अधिकारी यांचे फेर निवड करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने केले आहेत.