अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर सोलापूर महामार्गावरील वाकोडी फाटा येथील साईश्रद्धा हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.या कारवाई दरम्यान 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.
बातमीची हकीकत अशी की, वरील ठिकाणी हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असून तिथे परराज्यातील अल्पवयीन मुलीही आहे अशी माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी सदरची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती कळवली व त्यांच्यासह अवैध कुंटणखान्यात छापा टाकला. हॉटेल चालक शहानवाज वाहब आलम हुसैन याच्या विरुद्ध बीएएनएस 2023 चे कलम 96 सह पोक्सो व पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे,भिंगार कॅम्प सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे,सहाय्यक फौजदार अकोलकर,पोलीस हेडकॉन्स्टेबल पालवे,डोळे,प्रमोद लहारे, रवी टकले,पोलीस नाईक शेख, महिला पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांनी केली आहे.
