अहिल्यानगर (दि.२५ प्रतिनिधी):- शहरातील माळीवाडा बसस्टॅन्ड येथून महिला प्रवाशांच्या गळयातील मंगळसुत्र चोरी करणारी महिला मुददेमालासह जेरबंद करण्यात कोतवाली पोलीसांना यश आले आहे.बातमीची हकीकत अशी की,दि.२५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२/०० वा. सुमारास फिर्यादी नामे निलावती विठठलराव लोढे (वय ६६ वर्ष धंदा-घरकाम रा.घर नं ६७४१ चोपाटी कारंजा आयडीबीआय बँके शेजारी दिल्लीगेट अहिल्यानगर) या माळीवाडा बसस्टॅन्ड येथुन त्यांची मुलगी हिस भेटण्यासाठी पंढरपुर येथे जायचे असल्याने गळयात ५ ग्रॅम वजनाचे बोरमाळ घातलेली असताना माळीवाडा बसस्टॅन्ड येथे आल्यावर त्यांनी त्यांची गळयातील बोरमाळ हि त्यांचे कडे असलेल्या कपडयाचे बॅगेमध्ये वरील कप्यामध्ये ठेवुन बॅगेची चैन लावुन घेतली होती.त्या नगर ते पंढरपुर जाणा-या बसमध्ये बसण्यासाठी जात असताना बसचे दरवाज्याजवळ गर्दी असल्याने कशी बशीबस मध्ये जावून बसल्या व पंढरपुर गावाचे टिकीट काढण्यासाठी बॅगेची चैन उघडली असता त्यांना पाकीट मिळुन आले नाही.
त्यामुळे बोरमाळ ठेवलेले पाकीट शोधनेसाठी संपूर्ण बॅगेची पहाणी करता बॅगेमध्ये बोरमाळ ठेवलेले पाकीट मिळुन आले नाही तेंव्हा त्यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दिचा फायदा घेवुन बॅगेत ठेवलेले पाकिट व त्यात आसलेले सोन्याचे ५ ग्रॅम वजनाची बोरमाळ (गंठण) ही चोरुन नेले आहे अशी फिर्याद कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये दिली होती.त्यानुसार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजि.नंबर १४५/२०२५ भारतीय न्याय सहिंता २०२३ चे कलम ३३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की एक महीला ही माळीवाडा बसस्टॅन्ड येथे चोरीचे उददेशने गर्दीत घुसून गर्दीत घुसुन गर्दितील लोकांचे बॅगेमध्ये हात घालत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांनी कोतवाली पोलीस स्टेशचे गुन्हे शोध पथकातील अमलदार यांना बोलावुन घेवुन सदर बातमीची खात्री करुन आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने पथकातील अमलदार व महिला अमलदार यांनी माळीवाडा बसस्टॅन्ड येथे जावुन सापळा रचून थांबल्या असताना व खात्री केली असता एक महीला ही बसमध्ये बसण्यासाठी आलेल्या लोकांच्या गर्दीत घुसताना दिसली तिस महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रोहिणी दरंदले व पोलीस स्टाफ यांनी ताब्यात तिस तिचे नाव विचारले असता तिने तिचे नाव सविता गोविंद औताडे रा. आनंदनगर सिंहगड जि. पुणे मुळ रा.आष्टा कासार ता.लोहार जि. धाराशिव असे सांगितले तिला वरील गुन्हा संदर्भात विचारपुस केली असता तिचे सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर महिला आरोपी कडून गुन्हयातील चोरीच गेलेली सोन्याचे ५ ग्रॅम वजनाची बोरमाळ (गंठण) जप्त करणेत आली.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे, सपोनि.योगिता कोकाटे,पोहेकॉ. राजेद्र औटी,गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ/विशाल दळवी,पोहेकॉ/दशरथ थोरात,मपोहेकॉ/रोहिणी दरंदले,पोकॉ/अभय कदम, दिपक रोहोकले,तानाजी पवार, मपोना/वर्षा पंडीत व दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ/राहुल गुंडु यांनी केली आहे.