अहिल्यानगर (प्रतिनिधी):- केडगाव येथील मोहिनी नगर मध्ये राहणारी संगीता नितीन जाधव व आरोपी सारस दत्तू सुरवसे या दोघांमध्ये गेली तीन ते चार वर्षापासून प्रेम संबंध होते परंतु एक महिन्यापासून त्यांच्या या प्रेम संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.त्यामुळे संगीता जाधव यां महिलेचा तिचा प्रियकर सारस सुरवसे याने गळा आवळून खून करून तेथून पळ काढला होता.यां बाबत मयत महिलेच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन कोतवाली पोलिसांना आरोपी निष्पन्न करण्याचे आदेश दिले होते.तसा हा गुन्हा कोतवाली पोलिसांसाठी एक आव्हानच होता.या गुन्ह्याचा तपास स्वतः कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडे होता.
पोलीस निरीक्षक दराडे यांनी कंबर कसली व गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता कोकाटे व पोलीस अंमलदार यांच्या दोन टिम तयार करून त्या आरोपीचे मूळ राहते ठिकाण कर्जत तालुक्यातील माळी गल्ली येथे जाऊन त्याच्या नातेवाईकांना संपर्क केला व त्यांचे मोबाईल नंबर घेतले व मोबाईल सेल मार्फत लक्ष केंद्रित केले त्याचप्रमाणे त्याच्या राहत्या घरापाशी साध्या वेशातील पोलीस अंमलदार यांना वॉचकामी ठेवले.आज दि.26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता आरोपी सारस दत्तू सुरवसे याने शहरातील माळीवाडा परिसरातील रोडवर कपडे विक्री करणारे इसमाच्या मोबाईल वरून त्याच्या आईच्या मोबाईलवर संपर्क केल्याचे पोलिसांना समजले. यावरून सदर कापड विक्रेता याच्याकडून माहिती घेतली असता त्याने अशी माहिती दिली की त्याच्याकडून या आरोपीने एक लाल रंगाचा टी-शर्ट व काळे रंगाची नाईट पॅन्ट विकत घेतली व तो माळीवाडा बस स्थानकाच्या दिशेने गेल्याचे सांगितले.
गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे आरोपीच्या कर्जत येथील घराजवळ सापळा रचून थांबले होते कर्जत पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला तेथेच जागीच ताब्यात घेतले.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे,सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस अंमलदार राजेंद्र औटी, योगेश भिंगारदिवे,विशाल दळवी, संदीप पितळे,सलीम शेख,दीपक रोहकले,तानाजी पवार,अभय कदम,अतुल काजळे,सुरज कदम,सचिन लोळगे,अमोल गाडे,संकेत धीवर,राम हंडाळ, मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू व कर्जत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रकाश दंदाडे,किरण बोराडे,प्रताप देवकाते,होमगार्ड नेवसे यांनी केली आहे.