अहिल्यानगर (दि.27 प्रतिनिधी):- श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पोलीस लाचलुपतच्या जाळ्यात
▶️ *युनिट -*अहिल्यानगर.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय- 27 वर्षे
▶️ **आलोसे* – संतोष सुधाकर फलके, वय – 40 वर्ष, पद – पोलीस हवालदार बक्कल नंबर 361, वर्ग -3, नेमणूक श्रीगोंदा पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर सध्या राहणार जकाते वस्ती, दिगंबर बढे यांचे फ्लॅटमध्ये भाडोत्री, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर मुळ रा.प्लॉट नंबर १३, शिवनगर, सावेडी, अहिल्यानगर
▶️ *लाचेची मागणी*
7,000/- रुपये.
दिनांक -27/02/2025
▶️ **लाच स्विकारली*
7,000/ रुपये
दिनांक -27/02/2025
▶️ **हस्तगत रककम* –
7,000/-रुपये
▶️ *लाचेचे कारण*
तक्रारदार व त्यांचे इतर 13 नातेवाईक यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संतोष फलके यांच्याकडे आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी लोकसेवक संतोष फलके यांनी तक्रारदार यांच्याकडे 20,000/- रुपये
लाच मागणी केल्याबाबतची तक्रार दि.27/02/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.27/02/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक संतोष फलके, पोलीस हवालदार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष त्यांच्याविरुद्ध व इतर 13 नातेवाईक यांचे विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी प्रत्येकी 500 प्रमाणे एकूण
7,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दि.27/02/2025 रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक फलके यांनी तक्रारदार यांचे कडून 7,000/- रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ **सापळा व तपास अधिकारी*
श्री.राजू आल्हाट,
पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.9420896263
▶️ **सापळा पर्यवेक्षण अधिकारी**
श्री. अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र.वि., अहिल्यानगर, मो. क्र .8329701344
▶️ *सापळा पथक*
पोलीस अंमलदार महिला पोलीस हवालदार राधा खेमनर, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, चापोहेकॉ. दशरथ लाड
▶️ **मार्गदर्शक* –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर.
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*