अहिल्यानगर (दि.5 मार्च ):- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील सनफार्मा चौक, निंबळक चौक,एमआयडीसीतील M ब्लॉक,L ब्लॉक,G ब्लॉक व वखार महामंडळ परिसर येथील छुप्या पद्धतीने अवैध धंदे जोमाने सुरू झाल्याने एमआयडीसी पोलिसांनी डायरेक्ट अवैध धंद्यांवर जेसीबी नेत अवैध धंद्यांच्या टपऱ्या,पत्र्याचे शेड जमीनदोस्त केले आहे.
हि कारवाई दि.5 मार्च रोजी सकाळपासून सुरू करण्यात आली आहे.या कारवाईमुळे एमआयडीसीतील अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदरील कारवाईत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,एमआयडीसीचे उपअभियंता संदीप बडगे, ट्रेसर अनिल पांढरे,सहाय्यक अरेखक प्रदीप शिरसाट,पोलीस अंमलदार टेमकर,पोहेकॉ.चव्हाण,राजू सुद्रिक,किशोर जाधव,पोलीस नाईक आढाव,पोलीस कॉन्स्टेबल शेरकर,पोलीस कॉन्स्टेबल जाधव यानी सहभाग घेतला.