Maharashtra247

मोठी कारवाई पंचवीस गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीस तीन गावठी कट्टे व काडतुसासह एलसीबीने केले जेरबंद

 

नगर प्रतिनिधी (दि.२९ जानेवारी):-चाँदणी चौक येथे तीन (03) गावठी कट्टे व बारा (12) जिवंत काडतुस अवैधरित्या कब्जात बाळगुन बीड जिल्ह्यात विक्रीस घेवुन जाणारा सराईत आरोपी 1,13,700/- रु. (एक लाख तेरा हजार सातशे) रुपये किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. याबाबत माहिती अशी की श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, बीड जिल्ह्यातील रेकॉर्डवरील एक आरोपी हा गावठी बनावटीचे कट्टे व जिवंत काडतुस बीड येथे विक्री करण्यासाठी घेवुन जात असुन चाँदणी चौक, आरटीओ ऑफिस समोर, अहमदनगर येथे गाडीची वाट पाहत उभा आहे.आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई/सोपान गोरे,पोसई/मोहन गाजरे, सफौ/राजेंद्र वाघ,संजय खंडागळे,भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक,पोहेकॉ/विजय वेठेकर,देवेंद्र शेलार, सुरेश माळी,संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी,विशाल दळवी,राहुल सोळुंके,रवि सोनटक्के,पोकॉ/रविंद्र घुगांसे, विजय धनेधर,सागर ससाणे,मयुर गायकवाड,चापोहेकॉ/उमाकांत गावडे व चापोना/भरत बुधवंत अशांनी मिळून फळ विक्रेते व रिक्षा चालक असे वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने चाँदणी चौक येथे जावुन आरटीओ ऑफिस जवळ सापळा लावुन थांबलेले असताना एक पिवळे रंगाचा टी शर्ट व जिन्स पॅन्ट घातलेला व एक राखाडी रंगाची सॅक असलेला बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम दिसला पथकाची खात्री होताच पथक संशयीतास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना तो पळुन जावु लागला लागलीच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संशयीताचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले व पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) सुयोग ऊर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान,वय 23,रा. माळीवेस,सुभाष रोड,जिल्हा बीड असे असल्याचे सांगीतले.त्याची अंगझडती घेता अंगझडतीत एका राखाडी रंगाचे सॅकमध्ये तीन (03) गावठी बनावटीचे कट्टे व बारा (12) जिवंत काडतूस मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील इसमाकडे गावठीकट्टे व काडतुसा बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला.त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईन तपास करता त्याने सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस विक्री करीता बीड जिल्ह्यात घेवुन जात असल्याचे सांगितले.ताब्यातील आरोपीकडे तीन (03) गावठी कट्टे, बारा (12) जिवंत काडतूस व एक राखाडी रंगाची सॅक असा एकुण 1,13,700/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर बाबत सफौ/राजेंद्र देवमन वाघ ने. स्थागुशा,अहमदनगर यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. 61/2023 आर्म ऍ़क्ट 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व पुढील कायदेशिर कार्यवाही भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे सुयोग मच्छिंद्र प्रधान हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द पुणे,औरंगाबाद,बीड व अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी,चोरी व दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण -25 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. बीड शहर 120/2014 भादविक 379

2. बीड शहर 142/2014 भादविक 395, 397

3. बीड शहर 149/2018 भादविक 454, 380

4. शिवाजी नगर बीड 639/2018 भादविक 392, 34

5. शिवाजी नगर बीड 540/2019 भादविक 379

6. शिवाजी नगर बीड 242/2020 भादविक 324, 504, 506

7. गेवराई बीड 438/2020 भादविक 379, 34

8. शिवाजी नगर बीड 472/2020 भादविक 379

9. शिवाजी नगर बीड 69/2021 भादविक 379, 34

10. शिवाजी नगर बीड 221/2021 भादविक 379, 34

11. जामखेड, अहमदनगर 113/2021 भादविक 379, 34

12. शिवाजी नगर बीड 13/2021 भादविक 379, 34

13. शिवाजी नगर बीड 211/2021 भादविक 379

14. जामखेड, अहमदनगर 292/2021 भादविक 379, 34

15. शिवाजी नगर बीड 243/2021 भादविक 379, 34

16. शिवाजी नगर बीड 73/2021 भादविक 379, 511, 34

17. शिवाजी नगर बीड 237/2021 भादविक 379, 411, 34

18. पुंडलिक नगर औरंगाबाद 280/2021 भादविक 379, 34

19. शिवाजी नगर बीड 279/2021 भादविक 379, 411, 34

20. शिवाजी नगर बीड 182/2021 भादविक 379, 34

21. शिवाजी नगर बीड 185/2021 भादविक 379, 34

22. तळवडा, बीड 171/2021 भादविक 379

23. बीड शहर 145/2021 भादविक 379, 34

24. एमआयडीसी वाळुंज, औरंगाबाद 755/2021 भादविक 379, 34

25. भिंगार कॅम्प 61/2023 आर्म ऍ़क्ट 3/25, 7

सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page