बेलापुरात ख्वाजा गरीब नवाज़ची छट्टी मोठ्या उत्साहत साजरी;गौसे आजम सेवाभावी संस्थेकडून नागरिकांना मिठाई वाटप
बेलापूर प्रतिनिधी (दि.२९ जानेवारी):-गौसे आजम सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य बेलापुर बु झेंडा चौक ठिकाणी ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुस (छट्टी) मोठ्या उत्साहत मिठाई वाटप करुन साजरी करण्यात आली. यावेळी जामा मस्जिदचे मौलाना (धर्मगुरु) यांनी देशाच्या शांति व एकतासाठी परमेश्वराकड़े प्रार्थना केली. गौसे आजम सेवा भावी संस्थेचे संस्थापक मुख़्तार सय्यद यांनी ख्वाजा गरीब नवाज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पन केले यावेळी गौसे आजम संस्थाचे अध्यक्ष सुल्तान शेख,उपाध्यक्ष असीम शेख,सचिव नौसद शेख,गयाजभाई पठान, इरफ़ान शेख,रिक्षा यूनियनचे जीनाभाई शेख,रामगड शाखाचे अध्यक्ष तौफीक बागवान,भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक शाह,गौसे आजमचे कार्याध्यक्ष नासिर शेख,इ.उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायज पठान, सुल्तान शेख,असीम शेख यांनी अथक परिश्रम घेतले.