गोवंशीय जातीचे पाच जिवंत जनावरे कत्तलीसाठी नेणाऱ्या एकाला एलसीबीने मुद्देमालासह पकडले
नगर प्रतिनिधी (दि.३० जानेवारी):-निमगांव वाघा, ता.नगर येथुन महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 85,000/- रुपये किंमतीची पाच (05) जिवंत जनावरे व 5,00,000/- (पाच लाख) रुपये किंमतीचा टेम्पो असा एकुण 5,85,000/- (पाच लाख पंच्यशी हजार) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.बातमीतील हकीकत आशिकी श्री.राकेश ओला साहेब,पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ,पोहेकॉ/विजय वेठेकर,संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी,लक्ष्मण खोकले, पोकॉ/रणजीत जाधव व चापोना/भरत बुधवंत अशांना बोलावुन कळविले की,आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,निमगांव वाघा ते केडगांव जाणारे रोडवर काही इसम पिवळे रंगाचे टेम्पोमधुन गोवंश जनावरांची वाहतुक करुन कत्तलीसाठी घेवुन जात आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. अनिल कटके यांनी लागलीच पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे मदतीने दोन पंचाना सोबत घेवुन निमगांव वाघा ते केडगांव जाणारे रोडवर, निमगांव वाघा शिवारात सापळा लावुन थांबलेले असताना थोडा वेळात एक पिवळे रंगाचा टेम्पो येताना दिसला,टेम्पो चालकास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्याने टेम्पो थांबवला. चालकाने टेम्पो थांबवताच एक इसम टेम्पोमधुन उडी टाकुन पळु लागला त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आला नाही.ड्रायव्हर सिटवर एक इसम बसलेला दिसला त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)विलास वामन ढगे,वय 41,रा.जळवाडी, वाळकी,ता.नगर असे सांगितले.सदर टेम्पोची पाहणी करता पाठीमागिल हौदामध्ये लहान मोठी पाच जिवंत जनावरे व एक मयत बैल दाटीवाटीने भरलेले दिसले.ताब्यातील इसमाकडे टेम्पो व गोवंशीय जनावरे याबाबत विचारपुस करता तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला.त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकानईने चौकशी करता त्याने सदर टेम्पो व गोवंशी जनावरे ही पळुन गेलेला इसम नामे 2) जाहिद रऊफ सय्यद रा.कोठला,घासगल्ली, अहमदनगर याचे मालकिची असुन त्याचे सांगणे वरुन कत्तल करण्यासाठी घेवुन चाललो असल्याची कबुली दिली.ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जात पाच (05) लहान मोठी जिवंत जनावरे, (01) एक मयत बैल व वाहतुकीसाठी वापरलेला एक टेम्पो असा एकुण 5,85,000/- रु. (पाच लाख पंच्याशी हजार) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.सदर बाबत पोना/ लक्ष्मण चिंधु खोकले,ने. स्थागुशा अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन नगर तालुका पोलीस स्टेशन 77/23 ü महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम 5 (अ) सह मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अजित पाटील उविपो अनगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.