Maharashtra247

नियमित सराव केल्यानेच सर्व गुण संपन्न खेळाडू घडतो सेन्साई पराग पाटील,स्टेट लेव्हल कराटे चॅम्पियन स्पर्धेत खेळाडूंचे घवघवीत यश

 

वर्धा प्रतिनिधी (गजानन जिकार):- स्थानिक वर्धा येथील ट्रॅडिशनल शितो ऱ्यु कराटे अँड कोबुडो ऑर्गनायझेशन इंडिया द्वारा आयोजित 5 वी स्टेट लेव्हल कराटे चॅम्पियनशिप 2023 नुकतेच रत्नाकर सभागृह सेवाग्राम रोड वर्धा येथे यशस्वीरित्या पार पडली.या स्पर्धेत असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष सेन्साई पराग पाटील यांच्या कराटे शाखेतील खेळाडूंनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला.या कार्यक्रमात पाटील सर म्हणाले की,आजच्या अत्याधुनिक व मोबाईलच्या युगात खेळाडूंना पर्यायी अनेक खेळ खेळण्यासाठी असतात परंतु कोणत्याही एकाच खेळात नियमित सराव केल्यानेच सर्व गुण संपन्न खेळाडू घडू शकतो असे प्रतिपादन व्यक्त केले.प्राविण्य प्राप्त खेळाडू सोयल बेग, इलियास शेख ब्लॅक बेल्ट प्रथम व द्वितीय तसेच रेहान शेख, तन्मय वाल्दे, साहिल अली, अफजान खान, अनास शेख, आरिश शेख, अयान काझी, बालवीर, सोहेल शेख, पार्थ लोकटे यांनी प्राप्त केलेले प्रथम, द्वितीय, तृतीय मेडल व प्रमाणपत्र तसेच विशेष बाब म्हणजे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव श्री. राजेश अरोरा यांचा मुलगा चि. देवर्ष अरोरा यांनी सुद्धा सिल्वर मेडल प्राप्त केले होते. या सर्व खेळाडूंना त्यांनी प्राप्त केलेले पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे लॉयन्स ट्रॅडिशनल शोतोकान कराटे असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव शिहान उल्हास वाघ, ट्रॅडिशनल शितो ऱ्यु कराटे अँड कुबोडो ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शिहान शेख दत्तू, स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शिहान मंगेश भोंगाडे, कोकूसाई शोतोकान कराटे – डो अँड कोबुडो ऑर्गनायझेशन इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र सचिव शिहान रमेश भगत, ट्रॅडिशनल शितो ऱ्यु कराटे अँड कोबुडो ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय महासचिव शिहान कृष्णा ढोबळे, इंटरनॅशनल शोतोकान कराटे इन्स्टिट्यूट इंडियाचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी सेन्साई दिलीप कठाणे, वर्धा जिल्ह्यातील कराटे प्रशिक्षक सेन्साई महेंद्र परिहार, सेन्साई शशिकांत बोडखे, सेन्साई अभिजीत पारगावकर, सीनियर कराटे खेळाडू शिरीन शेख, दयाल धवने,बबलू शेख, प्रशांत गुजर,धनराज तांबीया व इत्यादी मान्यवर, समाजसेवी, मित्रमंडळ व कराटे प्रेमी प्रसार माध्यमाद्वारे शुभेच्छा व्यक्त करीत आहे.खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या प्रशिक्षकांना, माता पितांना व आपल्या सीनियर खेळाडूंना दिले.

 

 

You cannot copy content of this page