देवळी शहरात चोरांचा धुमाकूळ;देवळी ठाणेदार कुंभकर्ण झोपेत एका महिन्यात घडल्या सहा ते सात चोरीच्या घटना चोरांना पकडण्यात पोलीस प्रशासन अपयशी;एसपी साहेब कायद्याचा धाक तुम्ही आत्ता दाखवाच
वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):-देवळी शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे या शहरामध्ये २५ ते ३० लहान खेडे गाव लागून आहे या सर्व गावाचा दैनंदिन आवश्यक वस्तूंचा व्यवहार देवळी शहरातुनच होत असतो त्यामुळे देवळी शहरात भरणारा शुक्रवारी साप्ताहिक बाजार हा प्रसिद्ध आहे.या बाजारामध्ये ग्रामीण क्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात वस्तूंच्या देवाण-घेवाण करिता या बजारात येत असतात परंतु या साप्ताहिक बाजारामध्ये मोबाईल चोरांची टोळी सक्रीय झालेली आहे त्यामुळे या शुक्रवार बाजारामध्ये मागील काही हप्त्यांपासून मोबाईल चोरीचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे त्यामुळे नागरिकांच्या मोबाईल व मौल्यवान वस्तूंची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे.गेल्या शुक्रवारी सुद्धा आठ ते दहा जणांचे साप्ताहिक बाजारातून मोबाईल चोरी गेल्याणे ऐकच खळबळ उडाली काही जणांनी मोबाईल चोरीची तक्रार देवळी पोलीस स्टेशन मध्ये दिलेली आहे.या आधी ही साप्ताहिक बाजारामध्ये अनेक लोकांचे मोबाईल चोरी गेले होते त्यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती परंतु देवळी पोलीस या मोबाईल चोर टोळीचा पत्ता लावन्यास अपयशी ठरत आहे.मागील एका महिन्यात देवळी शहरांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे घडले त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून एका कापूस व्यापाराचे तीन लाख रुपये चोरी झाले,त्यानंतर त्याच परिसरातून ऐका शेतकऱ्याचे ७० हजार रुपये चोरी गेले,बस स्थानक परिसरातून महिलेचे दागिने चोरी गेले,व त्यानंतर एका ऑटोमोबाईलचे दार तोडून २० हजार रुपयाचे सामान चोरी गेले,व साप्ताहिक बाजारातून अनेक मोबाईल चोरीच्या घटना आता समोर येत आहे.देवळी शहरात चोरांनी घातलेला धुमाकूळामुळे देवळीकर जनता तसेच ग्रामीण क्षेत्रातील नागरिक यांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.देवळी शहरातील अनेक चोरी प्रकरणाची तक्रार देवळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली असून सुद्धा देवळी पोलिसांनी अजून पर्यंत या चोरांच्या टोळीवर अंकुश लावण्यात अपयशी ठरले आहे देवळीचे ठाणेदार कुंभकर्ण झोपेतून कधी जागे होतील?असा प्रश्न देवळीतील सामान्य जनता व ग्रामीण क्षेत्रातील नागरिक विचारत आहे.या देवळी पोलीस स्टेशनकडे पोलीस अधीक्षक वर्धा हे कधी लक्ष देतील,कुंभकर्ण झोपेत असलेले ठाणेदार यांना झोपेतून कधी जागे करतील?असा प्रश्न निर्माण झाला आहे.