अकोली येथे सुर्य नमस्कार योगाभ्यास प्रात्यक्षिक सादर
सेलू/वर्धा प्रतिनिधी (गजानन जिकार):-वर्धा जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळा,आकोली येथे विद्यार्थांना सूर्य नमस्कारचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांकडून हे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करून घेतांना जेष्ठ योग मार्गदर्शक दामोदर राऊत सर व योग शिक्षक प्रशांत तिमाने हे यावेळी उपस्थित होते.तसेच विविध आसणाचे प्रात्यक्षिक करून दाखविताना प्रशांत तीमाने सर यांचा मुलगा श्रीहरी तिमाने याने अतिशय उत्कृष्ट आयोजन करून योगाभ्यास प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न होण्यास मदत केली.यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व मुख्याध्यापका सह सर्व शिक्षक वृंदांचा या आयोजनात सिंहाचा वाटा होता.विद्यार्थांना “मंदिर मे ना मिलेंगे” हे गीत सुध्दा शिकविण्यात आले चिमुकला श्रीहरी याने तर उपस्थित सर्वांची मने जिंकली.