Maharashtra247

माजी सैनिक पतसंस्था व भारतीय माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यामानाने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा,या प्रजासत्ताक दिनास तृतीयपंथीय वकील ॲड.शिवानी सुरकार यांची विशेष उपस्थिती 

 

वर्धा प्रतिनिधी(सागर झोरे):-माजी सैनिक पतसंस्था आणि भारतीय माजी सैनिक संघटना वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात व रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमासह पार पडला मा.कर्नल सी घोष Lt col,मुर्गेसन कमांडर एनसीसी बटालियन वर्धा यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.प्रथम शहिदांना “अमर जवान ” स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून मशाल जागृती करून दिगुलद्वारे मानवंदना देण्यात आली व झेंडावंदन करून सुरेल बँड धून द्वारे राष्ट्रगीत झाले.या कार्यक्रमाला माजी सैनिक व हजारोंच्या संख्येने गणमान्य व्यक्ती व महिला उपस्थित होते या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून शिवानी सुरकार (प्रथम तृतीयपंथी वकील),आणि श्रीमती रिंकू बैरागी, प्रिन्सिपॉल स्कूल ऑफ स्कॉलर सावंगी वर्धा श्याम परसोडकर,अध्यक्ष सैनिक पतसंस्था व भारतीय माजी सैनिक संघटना,उपाध्यक्ष col चवडे सर,सचिव अरुण हस्ती,श्री.विजय बुटे,बाबाराव नागपूरे,श्री.शालिक पाटील,श्री.दिहिये,श्री.आसटकर,सौ.सोनाली वाळके.सौ नंदा पेटकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page