अहमदनगरचे नाव बदलण्या ऐवजी पहिले गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदला-दीपकभाई केदार पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष,संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा धीरेंद्र बाणेश्वरचा पॅंथर सेनेच्या वतीने निषेध
अहमदनगर प्रतिनिधी (दि.३० जानेवारी):-ऑल इंडिया पँथर सेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी सोमवारी (दि.30 जानेवारी) रोजी अहमदनगर शहरात राष्ट्रीय अध्यक्ष दिपाकभाई केदार आले होते.या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना केदार म्हणाले की ऑल इंडिया पँथर सेना येणार्या सर्व निवडणुका लढविणार आहे.बौद्ध, आदिवासी,मुस्लिम,शोषित घटकांच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी पँथर सेना मैदानात उतरली आहे.आठ वर्षात उभे राहिलेल्या हुकूमशाही धर्मसत्तेविरोधात देशभर निळा झेंडा हातात घेऊन, आंबेडकरवादी चळवळीने मानवता,बंधुत्व,समानता, न्याय,संविधान टिकवण्यासाठी हा लढा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मोदी प्रणीत भाजप सरकारची अराजकतेची व्यवस्था उखडून फेकण्याची ताकद फक्त आंबेडकरवादी शक्तीमध्ये आहे.ही चळवळ राजकीय रित्या गतिमान करण्यासाठी निळा शक्ती व निळा झेंडा घेऊन रणशिंग फुंकण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रात दलित अत्याचाराने थैमान घातले आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त दलितांवर अत्याचार झालेला आहे.हा जिल्हा अत्याचारग्रस्त घोषित करावा व दलितांना संरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी देखील त्यांनी केली.अहमदनगरचे नामांतर होऊ देणार नाही आमचा नामांतराला विरोध आहे.तसेच पडळकर यांना पुढे करुन नामांतर हा आरएसएसचा मुद्दा आहे.धनगर समाजाची भटकंती थांबविण्यासाठी त्यांना आर्थिक,सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी पडळकर यांनी भाजपच्या सत्तेचा वापर करावा. राजकारणासाठी माता अहिल्याबाई होळकरांचा वापर करू नये.अहमदनगरची स्थापना अहमदशहाने केली आहे.शहराचे नाव अहमद आहे म्हणून विरोध होत असेल तर,पहिले गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदलावे.तसेच मध्यप्रदेशातील इंदूरला अहिल्याबाई होळकरांचे नाव द्यावे व इंदूरचा राजवाड्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करुन भव्य स्वरुपात अहिल्याबाई यांच्या मुर्तीची उभारणी करण्याची मागणी देखील केदार यांनी केली.संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा धीरेंद्र बाणेश्वर हा ठगेश्वर असल्याचा घणघाती आरोप केदार यांनी केला.ते मानसिक रोगी आहे. सनातनी प्रवृत्तीतून त्यांनी मानवतावादी संत तुकाराम महाराज यांच्यावर टीका केली असल्याचे त्यांनी सांगितले.या वक्तव्याचा निषेध करुन ही प्रवृत्ती ठेचून काढण्याचा इशारा त्यांनी दिला.यावेळी पँथर सेनेचे राज्य अध्यक्ष विनोद भोळे, महासचिव सचिन तिवारी, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे,सरचिटणीस जितेश जगताप,प्रवक्ता बंटीभाऊ सदाशिवे,महाराष्ट्र सचिव बापूसाहेब लष्करे,भीमराज गोटे,संघटक मीनाक्षी बोर्डे, जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष पवन भिंगारदिवे,युवक जिल्हाध्यक्ष सागर ठोकळ,शहर जिल्हाध्यक्ष अतुल भिंगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके,उत्तर जिल्हाध्यक्ष राम दरोडे,कानिफ पोपळघट आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.