Maharashtra247

पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्ह्यात सरासरी ५०.४० टक्के झाले मतदान,जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी नगर शहरातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत केली मतदान प्रक्रियेची पहाणी

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.30 जानेवारी):-विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील १४७ मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्धरीतीने व शांततेत पार पडली.अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ५०.४० टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक शाखे मार्फत देण्यात आली आहे.पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लक्ष 15 हजार 638 मतदार होते. त्यापैकी 43 हजार 206 पुरुष तर 15 हजार 77 महिला अशा प्रकारे 58 हजार 283 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.2 फेब्रुवारी, 2023 रोजी या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मोजणी नाशिक येथे होणार असल्याची माहितीही निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.तत्पूर्वी सकाळी जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी अहमदनगर शहरातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत मतदान प्रक्रियेची पहाणी केली.

You cannot copy content of this page