Maharashtra247

देव तारी त्याला कोण मारी;सामाजिक कार्यकर्त्यांमुळे  घुबडाला मिळाले जीवदान

 

वर्धा प्रतिनिधी(सागर झोरे)(दि.31 जानेवारी):-डॉ.रोहित माडेवार संस्थापक अध्यक्ष रोटी फाउंडेशन भारत,सौ.टीशा माडेवार,ॲड.शिवानी सुरकार व अजय डोंगर हे सर्वजण वर्धेकडून गिरोलीकडे आपल्या चारचाकीने प्रवास करत असतांना त्यांना एक जखमी घुबड अचानकपणे जखमी अवस्थेत रस्त्यावर खळबळ करताना आढळले. माणुसकी या नात्याने त्या घुबडावर उपचार करण्याकरिता त्यांनी घुबडास पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झाले पण या घुबडाला पकडण्याकरिता जवळपास दीड तास अथक परिश्रम घ्यावे लागले यामध्ये त्यांना शेतामध्ये असलेल्या शॉकचा सामना करावा लागला.त्यानंतर त्यांनी सरळ वर्धा गाठून पीपल फॉर ॲनिमलचे अध्यक्ष आशिष गोस्वामी यांना थेट भेट दिली असता ऋषिकेश गोडसे यांनी घुबडावर प्रथम उपचार सुरू केले उपचार सुरू असताना यामध्ये असे आढळले की घुबडाचा अर्धा पंख हा नायलॉन मांजाने चिरला गेला होता.त्यामुळे नागरिकांनी पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा उपयोग करू नये त्यामुळे अशा दुर्घटना टळतील असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रोहित दादा माडेवार यांनी केले.

You cannot copy content of this page