अहिल्यानगर (प्रतिनिधी):- भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अंमलदार हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना एक इसम केंद्रीय विद्यालय येथे संशयरीत्या फिरताना दिसल्याने त्याची पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला त्याची पंचा समक्ष झडती घेतली असता त्याचा कब्जात सोनेरी मूठ असलेली लोखंडी धारदार तलवार आढळून आली.
पोलिसांनी त्याला त्याचे नाव गाव विचारले असतात त्यांनी त्याचे नाव ऋषिकेश अशोक बडे (रा.सारसनगर अहिल्यानगर) असे सांगितले. सदर इसमाविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती,भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार दीपक शिंदे रवी टकले,अजय गव्हाण,गोविंद गोल्हार,प्रमोद लहारे,शाहिद शेख यांनी केली आहे.