अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कंबरेला कोयता लटकवुन दहशत करणा-या तरुणास पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. सदरची कारवाई तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी सिव्हील हडको,निसार हॉस्पीटल समोर 26 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास केली आहे.
संदिप रमेश काकडे (वय 48 वर्षे रा.निसार हॉस्पीटल समोर, सिव्हील हाडको,ता.जि अहिल्यानगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या अंगझडतीमध्ये 500/- रु.कि.चा एक 19 इंच लांबीचा लोखंडी धारदार टोकास वाकडा असलेला कोयता मिळून आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती नगर शहर विभाग,पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील,पो.हे.कॉ.सुनिल चव्हाण,सुनिल शिरसाठ,योगेश चव्हाण,सुरज वाबळे,सतिष भवर,सुजय हिवाळे,सतिष त्रिभुवन,महेश पाखरे यांनी केली आहे.