अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शहरातील वार्ड क्रमांक 2 येथील वसंत टेकडी साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या मार्फत भव्य अश्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते . हि परंपरा त्यांनी अखंडित चालू ठेवली आहे.कितीही संकटे किंवा अडचणी आल्या तरी हा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे.हजारो साई भक्त या महाप्रसाद आणि आरतीसाठी उपस्थित असतात.दि.२७ मार्च २०२५ रोजी मा.आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिसाचे ओचित्य साधून नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी साई मंदिरात भव्य असे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य तपासणीसाठी इंडो आयरिश या हॉस्पिटलचे सहकार्य मिळाले,या शिबिरात आरोग्य तपासणी केल्यानंतर मोफत औषधें देण्यात आली आहेत.ज्यांना ऑपरेशनची गरज आहे,त्यांचे ऑपरेशन पण मोफत करण्यात येणार आहे,या शिबिरात अनेक वयोवृद्ध तसेच तरुणांनी सुद्धा आरोग्य तपासणी करून घेतली . असा हा सर्वांच्या आयुष्याच्या निघडीत प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या मार्फत करण्यात आले.तसेच या गुरुवारी खास महिलांसाठी झी मराठी प्रस्तुत आत्ता कस वाटतयं सिटीत गाणं गाजतंय हा अतिशय असा मनोरंजनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला आणि भरपूर असे बक्षिसे पण जिंकली, या मनोरंजनाच्या कार्यक्रमात वयोवृद्ध महिलांनी पण सहभाग नोंदविला.या कार्यक्रमासाठी प्रकाश पालवे,बाळासाहेब वाबळे,विजया पालवे,सर्जेराव गायकवाड,विमल गायकवाड,वैभव पोकळे,पै.निखिल त्र्यंबके, आकाश त्र्यंबके,तसेच इतर साईभक्त उपस्थित होते.