पुणे (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथील अनया आसिफ सय्यद हिने रमजानचे पूर्ण 29 दिवसाचे रोजा (उपवास) केले.वयाच्या 7 व्या वर्षी तिने रमाजानच्या पवित्र महिन्यात उपवास केले आहे.
रोज पहाटे तिने सहेरी करुन भक्तीभावाने नमाज अदा केली.अनया ही पुणे जिल्हा न्यायालयातील प्रसिद्ध ऍडव्होकेट.नसीब खान यांची कन्या आहे.ती इयत्ता दुसरी मध्ये पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.तिने केलेल्या रोजाबद्दल नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी तिचे कौतुक करुन अभिनंदन केले.