अहिल्यानगर (प्रतिनिधी):-घातपात करण्याच्या उद्देशाने तलवार घेवुन फिरणा-या इसमास तोफखाना पोलिसांनी 30 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अटक केली आहे.
उपनगरातील कृष्ठधाम रोड ते सोनानगर चौकाकडे जाणा-या रोडवर एक राखाडी रंगाचा टी शर्ट घातलेला इसम हातात एका पांढऱ्या रंगाच्या गोणी मध्ये तलवारी सारखे हत्यार घेवून फिरत आहे, आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी गोपनिय बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून सापळा लावून बातमीप्रमाणे नमुद इसम हाच असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अक्षय अशोक टकले (वय ३० वर्षे रा. निर्मलनगर,गाडेकर चौक) असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ 1000/- रु.किं.ची 26 इंच लांबीची धारदार पाते असलेली तलवार त्यास पकडण्यासाठी पितळी मुठ व ठेवण्यासाठी लाल रंगाचे म्यान असलेली तलवार मिळुन आली असुन सदर इसमाविरुध्द तोफखाना पो.स्टे येथे गुन्हा रजि नं. 348/2025, आर्म अॅक्ट कायदा कलम 4/25 प्रमाणे तसेच म.पो. अधि. कलम 37 (1), (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ.1407 भानुदास खेडकर हे करत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती नगर शहर विभाग,तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश बी.पाटील,पो.हे.कॉ. योगेश चव्हाण,सुनिल चव्हाण, अहमद इनामदार,वसिमखान पठाण,भानुदास खेडकर,सुमित गवळी,सतिप त्रिभुवन,सुजय हिवाळे,सतिष भवर,महेश पाखरे यांनी केली आहे.