अहिल्यानगर (प्रतिनिधी):- तोफखाना पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत लग्न समारंभात चोरीस गेलेले 647 ग्रॅम (64 तोळे 7 ग्रॅम) सोन्याचे आणि चांदीचे दागिने हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.चोरलेले दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही पोलिसांनी अटक केली आहे.फिर्याद ॲड.निखील बबन वाकळे (रा.उदय हौसींग सोसायटी,अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पत्नीला ठेवण्यासाठी दिलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने कपाटातून चोरी करून नेले होते.
त्यावरुन तोफखाना पोलीस ठाण्यात दि.10 मार्च 2025 रोजी तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं 238/2025 भा.न्या.सं.305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासा दरम्यान पोलिसांना फिर्यादींच्या भावाच्या लग्नात आलेल्या महिलेवर संशय आला. तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली.त्यावेळी तीने चोरी केलेले सोन्याचे दागिने घराशेजारील मोकळ्या जागेत खड्डा करून पुरून ठेवल्याचे उघडकीस आले.पोलिसांनी 647 ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने हस्तगत केले.तसेच चोरलेल्या दागिन्यांपैकी काही विकलेल्या सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही अटक करण्यात आली.अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांच्या सुचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे,सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत,उपनिरीक्षक शैलेश पाटील,अमोल गायधनी, पो.हे.कॉ.सुनिल शिरसाठ,सुनिल चव्हाण,योगेश चव्हाण,अहमद इनामदार,वसिमखान पठाण, भानुदास खेडकर,सुधीर खाडे, सुरज वाबळे,वाजीद शेख, पो.कॉ.सुमित गवळी,सतिश त्रिभुवन,सुजय हिवाळे, बाळासाहेब भापसे,सतिष भवर, महेश पाखरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या कारवाई केली.
पोलिसांनी चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिने अवघ्या बारा तासांत हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.हस्तगत केलेल्या दागिन्यांचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांच्या हस्ते फिर्यादी ॲड. निखील वाकळे यांना सुपूर्द करण्यात आला.यावेळी फिर्यादींनी पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले. पोलिसांच्या तात्काळ आणि कुशल कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.