अहिल्यानगर (प्रतिनिधी):- येत्या 6 एप्रिल रोजी रामनवमी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते.रामनवमीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आज शहरातील मिरवणूक मार्गाची पाहणी केली.यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती,तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे,कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुत्वादी संघटनेकडून मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली असून शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी पारंपारिक मार्गावरूनच मिरवणुकीला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. पारंपरिक मार्गावरून मिरवणुकीला परवानगी नाकारली तर जागेवरच मिरवणूक थांबविण्यात येईल असा पवित्रा आमदार जगताप यांनी घेतला आहे.