अहिल्यानगर (प्रतिनिधी):- गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने शहरात हॉटेल थापर इन जवळ आलेल्या 02 आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून आरोपीकडून 1 गावठी कट्टा व काडतुस जप्त करण्याची कारवाई केली आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती घेत असताना दि.4 एप्रिल रोजी पथकास बातमीदारामार्फत माहिती कळाली की,इसम नामे (राजेंद्र ससाणे,रा.जामखेड) हा त्याचे साथीदारासह गावठी कट्टा विक्री करण्यासाठी अहिल्यानगरमध्ये आला असून सध्या हॉटेल थापर इनजवळ, तारकपूर येथे असल्याची माहिती मिळाली.
पथकाने मिळालेल्या माहितीवरून हॉटेल थापर इन, तारकपूर येथे जाऊन संशयीत इसमांचा शोध घेऊन राजेंद्र बाळु ससाणे, वय 27, अमोल उर्फ युवराज साहेबराव ढावरे,वय 28, दोन्ही रा.नायगाव, ता.जामखेड,जि.अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले.पंचासमक्ष आरोपीकडून 30,000/- रू किं.एक गावठी पिस्टल, 1,000/- रू किं.त्यात 1 जिवंत काडतुस, 25,000/- रू किं.त्यात एक मोबाईल असा एकुण 56,000/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.ताब्यातील आरोपीकडे मिळून आलेल्या अगिशस्त्रांबाबत विचारपूस केली असता त्याने नमूद अग्नीशस्त्र व काडतुस हे सचिन अंकुश गायकवाड,रा.नायगाव, ता.जामखेड,जि.अहिल्यानगर (फरार) याचेकडून खरेदी करून ते विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती सांगीतली.नमूद आरोपी विरूध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुरनं 371/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक,श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार रोहित मिसाळ,मनोज लातुरकर, किशोर शिरसाठ,रमीजराजा आत्तार व अरूण मोरे यांनी केली आहे.