अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातुन 2 वर्षाकरीता हद्दपार केलेले 02 सराईत आरोपी लोणी येथून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.अन्सार सत्त्तार चौधरी,रा.नेवासा, जि.अहिल्यानगर व नदीम सत्तार चौधरी,रा.नेवासा, जि.अहिल्यानगर असे पकडलेल्या आरोपींचे नावे आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणी पोलीस स्टेशन हद्दीत फरार पाहिजे आरोपी व हद्दपार इसमांचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वरील हद्दपार केलेले इसम हे ममदापूर, ता.राहाता गावामध्ये आहेत.पथकाने मिळालेल्या माहितीवरून ममदापूर गावामध्ये हद्दपार इसमांचा शोध घेऊन ताब्यात घेतले.

पथकाने ताब्यातील इसम यांचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांचे कडील आदेशान्वये दि. 17/03/2025 रोजी पासुन अहिल्यानगर जिल्ह्यातून 2 वर्षाकरीता हद्दपार केले आहे.ताब्यातील इसमाकडे अहिल्यानगर जिल्हयात परत आले बाबत लेखी परवानगी घेतले बाबत विचारपूस केली असता त्यांनी अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती दिली.नमूद आरोपी हे हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या अहिल्यानगर जिल्हयामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आले.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला, श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात,पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे,गणेश भिंगारदे,ज्ञानेश्वर शिंदे,फुरकान शेख,संदीप दरंदले,रणजीत जाधव,शिवाजी ढाकणे, रमीजराजा आत्तार,प्रशांत राठोड,भाग्यश्री भिटे,उमाकांत गावडे व महादेव भांड यांनी केलेली आहे.
