कराटे सारख्या खेळातून चांगले व्यक्तिमत्व विकास होत असून एकात्मता व बंधुता हे गुण मुलांच्या अंगी येतात-इमरान राही
सेलू/वर्धा प्रतिनिधी (गजानन जिकार):-कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी कृतीशीलता व तत्परतेची गरज असते कराटे सारख्या खेळातून व्यक्तिमत्व विकास होत असून एकात्मता, बंधुता हे गुण मुलांच्या अंगी येतात असे मौलिक विचार स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक इमरान राही यांनी व्यक्त केले. 30 जानेवारी रोजी सत्येश्वर लॉन बोरगाव मेघे येथे असोसिएशनचे विजेते खेळाडूंच्या अभिनंदन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सतीश इखार,उपाध्यक्ष मोहन मोहिते,सचिव तथा स्पोर्ट शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सेन्साई मंगेश भोंगाडे,संस्थेचे क्रोषाध्यक्ष विजय सत्याम प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.गुणांची उत्पत्ती खेळातूनच होत असते ऊर्जा,उत्साह व उमंग हे गुण मनुष्यात असणे गरजेचे आहे. असे मत संस्थेचे अध्यक्ष सतीश इखार यांनी व्यक्त केले.प्रत्येकाने कुठला तरी खेळ खेळणे अनिवार्य आहे आणि खेळ खेळत असताना व स्पर्धेमध्ये आपले स्थान टिकवितांना खेळ हा खेळ भावनेतुनच खेळायला पाहिजे असे विचार सेन्साई मंगेश भोंगाडे यांनी प्रस्तावना करताना मांडले.सर्व पाहुण्यांच्या शुभहस्ते यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या स्पोर्ट शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाद्वारा आयोजित ओपन कराटे चॅम्पियनशिप मध्ये प्राविण्य प्राप्त ब्लॅक बेल्ट पुरुष गटात प्रथम कार्तिक भगत,ब्लॅक बेल्ट पुरुष गटात काता द्वितीय व कुमिते गटात तृतीय पियुष हावलादार, ब्लॅक बेल्ट महिला गटात तृतीय कल्याणी भोंगाडे,सब ज्युनिअर चॅम्पियनशिप कुमिते गटात प्रथम भार्गव खेवले,द्वितीय नैतिक सिंग, तृतीय दीक्षांत वासनिक,व रुजान बागमोरे,नैतिक आवारी,प्रथमेश ढाले,सौरभ लाखे, चैतन्य मोहरकर, आरुष रंगारी,रिशीत मिश्रा, पियुष सिंग,देवांशु लाखे, पलक लक्षणे,मानसी गोमासे, नेहा गोल्हर,पलक यादव, कवीश ठोंबरे,प्रियांक पुसाटे, शुभ्रा भगत यांना त्यांनी प्राप्त केलेले मेडल,ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन सावंगी मेघे शाखाप्रमुख सेन्साई सुशांत जीवतोडे यांनी तर आभार असोसिएशनच्या चॅम्पियन टीमचे कॅप्टन सेन्साई कार्तिक यांनी आभार मानले.