अवैध गावठी हातभट्टी,देशी दारू ठिकाणांवर एलसीबीचा छापा
अहमदनगर प्रतिनिधी (दि.३१ जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन ०३ आरोपी विरुध्द कारवाई करुन ३८,७६०/- (अडतीस हजार सातशे साठ रुपये किंमतीची देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या १६८ सिलबंद बाटल्या,अवैध गावठी हातभट्टीची साधने ४०० लिटर कच्चे रसायन व ७० लिटर तयार दारु नाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/विजय वेठेकर, बापुसाहेब फोलाणे,संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी, संतोष लोढे,संदीप चव्हाण, संदीप दरंदले,भिमराज खर्से, पोकॉ/रोहिदास नवगिरे, जालिंदर माने व चापोहेकॉ / अर्जुन बडे यांचे पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी शेवगांव व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.२९/०९/२३ व दि.३०/०१/२३ रोजी कारवाई करुन ०२ ठिकाणी छापे टाकुन एकुण ३८,७६०/- रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या १६८ सिलबंद बाटल्या,गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे ४०० लि.कच्चे रसायन,७० लि.गावठी हातभट्टीची दारू जप्त करुन खालील प्रमाणे ०३ आरोपीं विरुध्द शेवगांव व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.आरोपीचे नांव अ.नं.पोलीस ठाणे गुरनं व कलम शेवगाव ७३ / २०२३ मु.प्रो. अॅ.क. ६५ (ई) १)कुलदिप बळीराम कोकाटे वय २६, रा. बोधेगांव, ता. शेवगांव २) किशोर इलिटम रा. बोधेगांव,श्रीरामपूर शहर ९८ / २०२३ मु.प्रो.अॅ.क. ६५ (ई) (फ) १) श्रीकांत प्रभाकर काळे, वय २८, रा. भैरवनाथ नगर,श्रीरामपूर
जप्त मुद्देमाल
११,७६०/- देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या १६८ सिलबंद बाटल्या,३०,०००/- रु.किचे ६०० लि. कच्चे रसायन ५,०००/- रु. किची १०० लि. तयार दारु ३८,७६०/- रु. कि.ची ४०० कच्चे रसायन ७० लि.गावठी हातभट्टीची तयार दारु व देशी भिंगरी संत्रा कं.च्या १६८ सिलबंद बाटल्या,सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.