माजी सैनिकाचा विश्वास संपादन करून भामट्यांनी ५ लाख ९३ हजार ८९७ रूपयांची ऑनलाईन केली फसवणुक
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१ फेब्रुवारी):-एसबीआय युनो बँकमधून बोलतो,असे खोटे सांगून एका माजी सैनिकाचा विश्वास संपादन करून त्यांची ५ लाख ९३ हजार ८९७ रूपयांची ऑनलाईन फसवणुक केली आहे. रविंद्रपाल जसवंत सिंग (वय 58 रा. जनरल अरूण वैद्य कॉलनी,जामखेड रोड, नगर) असे फसवणुक झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.ही घटना सोमवारी दुपारी घडली.या प्रकरणी सोमवारी रात्रीच सायबर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या मोबाईल नंबरवर सोमवारी दुपारी एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने एसबीआय युनो बँक डिपार्टमेंटमधून बोलतोय, असे सांगून,तुमचे युनो एसबीआय अकाऊंट हे बंद झाले आहे.ते चालू करायचे आहे,असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.युनो एसबीआय अकाऊंट चालू करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा,अशी बातावणी करून फिर्यादीकडून ओटीपी घेतला.यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून ५ लाख ९३ हजार ८९७ रूपये काढून घेत फसवणुक केली आहे. यासंदर्भात फिर्यादी यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.